const e=e=>{const o=window.location.origin;navigator.sendBeacon(`${o}/scooby/api/v1/log/event`,JSON.stringify(e))};e({page_url:window.location.href,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),(()=>{const o=window.history.pushState;window.history.pushState=new Proxy(o,{apply:(o,r,n)=>{const t=window.location.href,i=o.apply(r,n),a=window.location.href;return t!==a&&e({page_url:a,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),i}})})();

Pune Water Problem : पुण्याला दोन महिने पुरेल इतकेच पाणी ; धरणसाठ्यात घट

खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये मिळून पुणे शहराला आगामी दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत शहराला आवश्‍यक असणाऱ्या पाणीसाठ्याच्या तुलनेत सुमारे सव्वादोन टीएमसी पाणी कमी आहे.
Pune Water Problem
Pune Water Problemsakal

पुणे : खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये मिळून पुणे शहराला आगामी दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत शहराला आवश्‍यक असणाऱ्या पाणीसाठ्याच्या तुलनेत सुमारे सव्वादोन टीएमसी पाणी कमी आहे. त्यामुळे पुणेकरांना आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. अन्यथा येत्या मे महिन्यात पुणेकरांना भीषण पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

शहराला खडकवासला प्रकल्पांतील खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या धरणांमधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. खडकवासला प्रकल्पांतील उपलब्ध पाणीसाठ्यापैकी शहराला पिण्यासाठी सुमारे चार टीएमसी इतकेच पाणी उपलब्ध होणार आहे. उपलब्ध होणारा हा साठा शहराला आणखी केवळ दोन महिने म्हणजेच मे महिन्याच्या मध्यापर्यंत पुरेल इतकाच आहे. परिणामी मे महिन्याच्या अखेरीस शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी पाणीटंचाईचा सामना टाळण्यासाठी पुणेकरांना आत्तापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. या वृत्तास जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

रब्बी, उन्हाळी पिकांसाठी दोन आवर्तने

जलसंपदा विभागाने पुणे शहराला पिण्यासाठी वर्षाला १४.६१ टीएमसी पाणी कोटा मंजूर केलेला आहे. प्रत्यक्षात एका वर्षाला २०.४९ टीएमसी इतके पाणी पुणेकर वापरत आहेत. यानुसार दरमहा सरासरी १.७० टीएमसी पाणी हे पुणेकरांसाठी लागत असते. त्यातच आता उपनगरांमध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढले असून जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील आणखी २३ गावे ही महापालिकेत समाविष्ट झाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुणे शहराला दरमहा दोन टीएमसीहून अधिक पाणी लागते. यानुसार सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा हा फार फार तर मे महिन्याच्या मध्यापर्यंत पुरू शकणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. याशिवाय रब्बी आणि उन्हाळी पिकांसाठी प्रत्येकी दोन आवर्तने सोडण्यात येत असतात.

Pune Water Problem
Pune Real Estate News : घरांच्या नोंदणीत फेब्रुवारीमध्ये २३ टक्के वाढ ; नाईट फ्रॅंक इंडियाचा अहवाल,मुद्रांकशुल्क ६२० कोटी रुपयांवर

प्रकल्पातील एकूण

उपयुक्त पाणीसाठा

२९.१५

सध्या उपलब्ध असलेला साठा

१३.०१

प्रत्यक्षात वापरले

जाणारे पाणी (वार्षिक)

२०.४९

गतवर्षीच्या तुलनेत

पाणीसाठा

- २.३३

शहराला मंजूर

पाणी कोटा (वार्षिक)

१४.६१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com