Pune Real Estate News : घरांच्या नोंदणीत फेब्रुवारीमध्ये २३ टक्के वाढ ; नाईट फ्रॅंक इंडियाचा अहवाल,मुद्रांकशुल्क ६२० कोटी रुपयांवर

पुणे शहरातील रिअल इस्टेट क्षेत्राची वेगाने वाढ होत असून, घरांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. फेब्रुवारीमध्ये घरांच्या नोंदणीमध्ये वार्षिक २३ टक्के वाढ झाल्याचे आढळून आले आहे.
Pune Real Estate News
Pune Real Estate Newssakal

पुणे : पुणे शहरातील रिअल इस्टेट क्षेत्राची वेगाने वाढ होत असून, घरांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. फेब्रुवारीमध्ये घरांच्या नोंदणीमध्ये वार्षिक २३ टक्के वाढ झाल्याचे आढळून आले आहे. फेब्रुवारी महिन्यात एकूण १७,५७० घरांची नोंदणी झाली. मागील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात ही संख्या १४,२८४ होती.

मुद्रांकशुल्क संकलनातही २० टक्के वाढ झाली असून, फेब्रुवारी महिन्यात ६२० कोटी रुपयांचे शुल्क जमा झाले आहे. मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये ५१७ कोटी रुपये शुल्क जमा झाले होते. परवडणाऱ्या किमती आणि ग्राहकांमधील वाढलेला सकारात्मक दृष्टीकोन यामुळे घरांच्या खरेदीत लक्षणीय वाढ झाली आहे, असे नाईट फ्रॅंक इंडियाच्या अहवालात म्हटले आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये ५० लाख रुपये आणि एक कोटी रुपये किंमतीच्या घरांच्या नोंदणीतील वाढ सर्वाधिक ३२ टक्के आहे, तर २५ लाख ते ५० लाख रुपयांदरम्यानच्या घरांची नोंदणी ३० टक्के आहे.२५ लाख रुपयांपेक्षा कमी किंमतींच्या घरांची नोंदणीचे प्रमाण फेब्रुवारी २०२३ मधील १६ टक्क्यांवरून २२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

उच्च मूल्य श्रेणीतील म्हणजेच एक कोटी रुपये व त्याहून अधिक किंमतींच्या घरांच्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली असून, एकूण बाजारातील हिस्साही वाढला आहे. या श्रेणीतील मालमत्तांचा वाटा फेब्रुवारी २०२३ मधील १० टक्क्यांच्या तुलनेत फेब्रुवारी २०२४ मध्ये १४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे, तर ५०० ते ८०० चौरसफूट क्षेत्रफळाच्या घरांचा वाटा ४० टक्के आहे. ५०० चौरसफुटांपेक्षा कमी आकाराच्या घरांचा हिस्सा ३५ टक्के आहे. मोठ्या आकाराच्या म्हणजे एक हजार चौरसफूट क्षेत्रफळापेक्षा अधिक आकाराच्या घरांची मागणी स्थिर म्हणजेच १३ टक्क्यांवर राहिली.

फेब्रुवारीमध्ये मध्य पुणे म्हणजे हवेली तालुका, पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगर पालिका या परिसरातील घरांना सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून आले. एकूण नोंदणीत या परिसराचा वाटा ७८ टक्के आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यात किंचित घट झाली आहे. शहरातील इतर भागांमध्ये तयार होत असलेल्या नव्या घरांनाही ग्राहकांची पसंती मिळत असल्याने या परिसरातील मागणीत तुलनात्मक घट दिसत आहे. मावळ, मुळशी आणि वेल्हे या पश्चिम पुणे परिसरातील घरांची नोंदणी १२ टक्के आहे. त्यानंतर उत्तर, दक्षिण व पूर्व परिसरातील वाटा ११ टक्के आहे.

Pune Real Estate News
Pune Crime News : चाकण,महाळुंगे परिसरातली गुन्हेगारी धोकादायक ; गुन्हेगारीला चाप लावण्याची गरज

ठळक निष्कर्ष

  • उच्च किमतीच्या ५० लाख ते एक कोटी रुपये किंमतीच्या घरांच्या नोंदणीत सर्वाधिक वाढ

  • २५ लाख रुपयांपेक्षा कमी किंमतींच्या घरांच्या नोंदणीत वार्षिक सहा टक्के वाढ

  • गृहखरेदीदारांमध्ये सर्वाधिक ५३ टक्के हिस्सा ३० ते ४५ वर्षे वयोगटातील ग्राहकांचा

  • ३० वर्षे वयाखालील ग्राहकांचा वाटा २४ टक्के, तर ४५ ते ६० वर्षे गटातील ग्राहकांचा हिस्सा १७ टक्के आहे.

  • मध्य पुणे परिसरातील घरांना सर्वाधिक मागणी

पुण्यातील रिअल इस्टेटची बाजारपेठ ही गृहमालकीबाबत सकारात्मक दृष्टिकोन, परवडणारे दर आणि कर्जपुरवठ्याच्या सुविधा यामुळे सातत्याने वाढ दर्शवत आहे. फेब्रुवारीतील ही वाढ वर्षाची आशादायी सुरुवात दर्शवते. पायाभूत सुविधांमधील सुधारणा आणि आर्थिक विकासासोबत पुण्याच्या निवासी मालमत्ता बाजारपेठेचा पाया भक्कम बनत आहे.

- शिशिर बैजल, अध्यक्ष, नाईट फ्रॅंक इंडिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com