
Graduate Constituency Election
Sakal
खडकवासला : पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, खडकवासलाज विधानसभा मतदार संघातील पात्र शिक्षक आणि पदवीधर नागरिकांनी लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवण्यासाठी आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ.यशवंत माने आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार किरण सुरवसे यांनी केले आहे.