
पुणे : खडकवासला धरण साखळीत आज सोमवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण १०.७४ टीएमसी म्हणजेच ३६.८३ टक्के पाणी साठा आहे, तर खडकवासला धरणाच्या सांडव्यातून आज १.६४ टीएमसी पाणी विसर्ग करण्यात आले आहे. आज साखळीत चारही धरणांतून मिळून एकूण २९१ दशलक्ष घनफूट इतकी पाण्याची आवक झाली आहे.