खडकवासला जलाशय रक्षण अभियान; रंगपंचमीला धरण परिसरात येण्यास बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Khadakwasla reservoir protection

खडकवासला जलाशय रक्षण अभियान; रंगपंचमीला धरण परिसरात येण्यास बंदी

खडकवासला : जिल्हाधिकारी कार्यालय, पाटबंधारे विभाग ग्रामीण पोलिस यांच्या मदतीने शुक्रवार दि.१८ मार्च धुलिवंदन, मंगळवार दि. २२ मार्च रोजी रंगपंचमीच्या दिवशी खडकवासला जलाशय रक्षण अभियान राबविण्यात येणार आहे. परिणामी नागरिकांना या दोन्ही दिवशी धरण चौपाटी परिसरात येण्यास बंदी करण्यात आली आहे. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

या मोहिमेच्‍या अंतर्गत यंदाचे हे 20वे वर्ष आहे. असून धुलीवंदन व रंगपंचमी या दोन्‍ही दिवशी प्रबोधनात्‍मक फलक, हातात धरून सकाळी 9 पासून सायंकाळी 5 पर्यंत खडकवासला जलाशयाच्‍या भोवती मानवी साखळी करण्‍यात येणार आहे. अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले, सनातन संस्थेचे प्रा. विठ्ठल जाधव, रणरागिणी शाखेच्या क्रांती पेटकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. हा उपक्रम हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्‍था, खडकवासला ग्रामस्‍थ, महसूल, पाटबंधारे विभाग, हवेली पोलिस, सिंहगड पावित्र्य मोहीम यासह अन्य समविचारी संघटना उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन राष्ट्रीय संपत्तीचे संवर्धन अन पर्यावरण रक्षण करतात.

हिंदु संस्‍कृतीतील प्रत्‍येक सण, उत्‍सव, व्रत पर्यावरणपूरक आणि आध्‍यात्‍मिक उन्‍नतीला पोषक आहेत. मात्र सण-उत्‍सवांमागील धर्मशास्‍त्र माहिती नसल्‍याने उत्‍सवांमध्‍ये अपप्रकार शिरल्‍याचे दिसून येते. या शिक्षणाच्‍या अभावी सण- उत्‍सव यामागील मूळ उद्देशच संपत असल्याचे दिसते. यातील अपप्रकारांचा शिरकाव झाला आहे. धुलीवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रासायनिक रंग लावून खडकवासला जलाशयात आंघोळीसाठी येणे, हा या अपप्रकारांमधीलच एक भाग आहे. यामुळे, पुणे शहर व जिल्हाला पाणीपुरवठा करणारा जलस्रोत प्रदूषित होतो. याचे रंगलेल्या युवावर्गाला भानही नसते. हे रोखण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. असे ही या संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने पुण्‍याचे निवासी उपजिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा न्‍यायदंडाधिकारी हिम्‍मत खराडे यासह खडकवासला कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनाही निवेदन दिले आहे. या वेळी विजय पाटील यांनी ‘या मोहिमेला साहाय्‍य करणार’ असे सांगितले. साहाय्‍यक पोलीस उपायुक्‍त (विशेष शाखा) यांनाही निवेदन दिले आहे.

Web Title: Khadakwasla Reservoir Protection Rang Panchami No Access To Dam Area

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune Newsdamdamage water
go to top