esakal | खडकवासला गाव 'एवढे' दिवस राहणार बंद
sakal

बोलून बातमी शोधा

khadakwasla.jpg

खडकवासला गावाच्या हद्दीमध्ये मागील तीन दिवसात रुग्ण संख्या वाढल्याने  कोरोनाचे उपचार घेणाऱ्यांची संख्या 26 झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून म्हणून ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या मदतीने उद्या पासून पाच दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.

खडकवासला गाव 'एवढे' दिवस राहणार बंद

sakal_logo
By
राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला (पुणे) : खडकवासला गावाच्या हद्दीमध्ये मागील तीन दिवसात रुग्ण संख्या वाढल्याने  कोरोनाचे उपचार घेणाऱ्यांची संख्या 26 झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून म्हणून ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या मदतीने उद्या पासून पाच दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. अशी माहिती खडकवासला गावचे सरपंच सौरभ मते यांनी दिली.
 

तरुणांनो, 'या' १० क्षेत्रांत लाॅकडाऊनमध्येही मिळतेय नोकरीची संधी!​

खडकवासला गाव ९ जुलैपासून १३ जुलै रोजी रात्री बारा पर्यत संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या काळात फक्त दवाखाना, मेडिकल दुकान व दुधाची दुकान सुरू राहतील. गावामधील किराणा दुकान,  भाजीपाला, चिकन, मटन, अंडी अशी सर्व दुकाने पूर्णपणे बंद करण्यात येणार आहेत. खडकवासला हे किरकटवाडी पासून गोऱ्हे बुद्रुक पानशेत पर्यंतची मोठी 
बाजारपेठ असलेले गाव आहे. कापड दुकाने, भाजी मंडई, रुग्णालय, हार्डवेअर, बिल्डिंग मटेरियल सप्लाय अशी अनेक दुकाने आहेत. परिणामी मोठ्या संख्येने येथे लोक येत असतात.

खासदार डॉ. अमोल कोल्हे झाले होम क्वारंटाईन, कारण...​

किराणामाल व भाजी दुकानदारांशी संपर्क साधावा व होम डिलीवरी करुन घ्यावी. जर कोणी साहित्य पुरवण्यास नकार दिल्यास ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा. गावामध्ये मास्क न घालता फिरताना कोणी आढळल्यास त्यास ५००रुपये दंड आकारण्यात येईल. असे ही सरपंच सौरभ मते यांनी सांगितले. या बैठकीला ग्रामपंचायत सदस्य सचिन मते, अजय मते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास मते, जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य अशोक मते, पोलीस पाटील ऋषिकेश मते, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अक्षय मते, शिवसेनेचे महेश मते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महादेव मते व विजय मते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आनंद मते, अतुल पवार, सुरेश मते, शिक्षक यशवंत जाधव, आदित्य मते, वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना गवळी पोलीस निरीक्षक अशोक शेळके, ग्रामसेवक अरुण हेगडे यावेळी उपस्थित होते.

मास्क न घातल्याचा 6600 रुपयांचा दंड वसूल
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक आहे. त्यानुसार मास्क न वापरणाऱ्या वर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार आमच्या गावात सर्व नागरिकांना सूचना दिल्या आहेत. 'खडकवासला गावामध्ये मास्कशिवाय घराबाहेर कोणी पडत असेल तर त्यांच्याकडून दंड आकारण्यात येत आहे. त्यानुसार मागील दोन दिवसात सुमारे पाच हजार रुपयांचा दंड जमा केला आहे. तर आज बुधवारी सोळाशे रुपयांचा दंड जमा करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे सहा हजार सहाशे रुपयांचा दंड आकारला आहे. ग्रामपंचायतीच्या सात नंबर प्रमाणे त्यांना रीतसर पावती देण्यात येत आहे.', असे ग्रामविस्तार अधिकारी अरुण हेगडे यांनी सांगितले. 

loading image
go to top