खडकवासल्यातून आज पुन्हा सोडले यंदाचे सर्वाधिक पाणी 

ज्ञानेश्‍वर बिजले 
Thursday, 8 August 2019

पुणे : खडकवासला धरणातून आज सकाळी नऊपासून पुन्हा या वर्षातील सर्वाधिक पाणी सोडण्यास प्रारंभ झाला असून, पुन्हा शहरातील काही पूल पाण्याखाली जाणार आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाल्यास, दुपारनंतर धरणातून पाणी सोडण्याचे प्रमाण थोडे कमी करण्यात येईल. 

घाटमाथ्यावर पर्जन्यवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्याने, तसेच काल रात्री पाऊस सुरू झाल्याने, खडकवासला धरणातून पाणी सोडण्याचे प्रमाण वाढविण्यात आले. सकाळी सहा वाजता 41 हजार 624 घनफूट प्रति सेकंद (क्‍युसेक) पाणी सोडण्यात येत होते. सकाळी नऊ वाजता त्यात वाढ करून ते 45 हजार 474 क्‍युसेक करण्यात आला. 

पुण्यात पुरस्थिती पाच ऑगस्टला निर्माण झाली, त्यावेळी पुण्यातून 45 हजार 474 क्‍युसेक एवढा जास्तीत जास्त विसर्ग सुरू होता. तेवढेच पाणी आज सकाळी पुन्हा सोडण्यात सुरवात झाली. खडकवासला धरण साखळीतील चारही धरणे शंभर टक्के भरल्याने आता पडलेल्या पावसाचे पाणी थेट पुण्याकडे सोडून द्यावे लागत आहे. 

पानशेत धरणातून सकाळी नऊ वाजता 13 हजार 531 क्‍युसेक, वरसगावमधून 16 हजार 741 क्‍युसेक, टेमघर धरणातून दोन हजार 943 क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे. 

खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार म्हणाले, ""गेल्या तीन वर्षांत सध्या मुठा नदीत सोडण्यात येत असलेले पाणी हा सर्वांधिक विसर्ग आहे. पाच ऑगस्टला धरणातून 45 हजार क्‍युसेक पाणी सोडले. त्यामुळे, पाण्याचा किती प्रवाह शहराच्या कोणत्या भागात जातो, त्याचा अंदाज आला. तेवढेच पाणी आता सोडले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असला तरी, त्याचा जोर फारसा नाही. त्यामुळे, दुपारी पाणी सोडण्याच्या प्रमाणात घट होऊ शकेल. धरणाच्या जलाशयात किती पाणी येते आहे, त्यावर अंदाज बांधून धरणातून विसर्ग सोडण्याचे प्रमाण ठरविण्यात येईल.'' 
पवना धरणातून 12 हजार तीनशे क्‍यसेक, तसेच मुळशी धरणातून 18 हजार 830 क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे, बंडगार्डन येथील नदीच्या पाणीपातळीत सायंकाळी वाढ होईल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khadakwasla witness highest water release of the year