Khadakwsla News : शिक्षक रुजू झाल्यामुळे पालकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

वारजे माळवाडीतील महापालिकेच्या शाळेतील पालकांनी शिक्षक मिळत नसल्याने जाहीर केलेले आंदोलन आज शिक्षक रुजू झाल्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले पण पूर्णपणे रद्द केलेले नाही.
Parents Agitation
Parents AgitationSakal

खडकवासला - वारजे माळवाडीतील महापालिकेच्या शाळेतील पालकांनी शिक्षक मिळत नसल्याने जाहीर केलेले आंदोलन आज शिक्षक रुजू झाल्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले पण पूर्णपणे रद्द केलेले नाही. आता यापुढे शिक्षकांची संख्या कमी झाली तर कोणतीही पूर्व सुचना न देता टाळे ठोकण्यात येईल. असे यावेळी शाळा व्यवस्थापन समिती, पालक व माजी‌ नगरसेवक यांनी जाहीर केले.

कै.शामराव श्रीपती बराटे इंग्रजी माध्यम शाळा १६१ बी मध्ये पहिली ते सातवीच्या वर्गाच्या प्रत्येकी दोन- दोन तुकडे आहेत. यामध्ये, ४८१ विद्यार्थी शिकत आहे. शिक्षण व बाल हक्क कायद्यानुसार (३० विद्यार्थी मागे, एक शिक्षक ) पटानुसार १६ शिक्षक व एक मुख्याध्यापक पाहिजे. पण महापालिकेत शिक्षक संख्या कमी असल्याने आम्ही शाळेत १ली ते ७वी पर्यंत १४ वर्ग आहे. या १४ वर्गांसाठी किमान प्रत्येकी एक प्रमाणे १४ शिक्षक व एक मुख्याध्यापकाची मागणी आहेत.

आंदोलनासाठी सकाळी पावणे सात वाजता सर्व पालक विद्यार्थ्यांना घेऊन उपस्थित राहिले होते. यावेळी माजी उपमहापौर दिलीप बराटे,‌ शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप उर्फ बाबा धुमाळ, माजी नगरसेवक सचिन दोडके, नगरसेविका दिपाली धुमाळ, सायली वांजळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सविता भोसेकर समितीचे सदस्य संजय बनचरे, तेजस पायगुडे, प्राजक्ता अहिवळे, नेहा काकडे, बबीता विश्वकर्मा, रीना देवी, आरती झोरे, सुवर्णा रणदिवे, भाग्यश्री वांजळे, नीलम खांभे, प्रीती पुजारी, सोनाली पवार, दीक्षा कांबळे, सुनिता‌ कुलकर्णी, सुरेखा देशमुख उपस्थित होते.

पर्यवेक्षिका अनिता रेंगडे यांनी शाळेत शाळेत येऊन व्यवस्थापन समितीशी संवाद साधला. रुजू शिक्षकांची माहिती घेतली. दरम्यान, प्रभारी मुख्याध्यापिका जया वाल्हेकर यांनी उपस्थितांना तुमच्या मागणीनुसार सात शिक्षक सोमवारी संध्याकाळी रुजू झाले आहेत. त्यामुळे आंदोलन करू नये. अशी भूमिका मांडली.

माजी नगरसेवकांनी त्यांनी केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. शिक्षण विभागाच्या वतीने ती माहिती देण्यासाठी कोणी उपस्थित राहिले नाही. याबद्दल, नगरसेवकांनी निषेध व्यक्त केला. आज आम्ही पालकांच्या संमतीने हे आंदोलन शिक्षक पुरेसे उपलब्ध झाल्यामुळे स्थगित करीत आहोत.

आमच्या माहितीनुसार आज रुजू झालेले शिक्षक हे तात्पुरत्या स्वरूपाचे किंवा काही दिवाळीची सुट्टी संपेपर्यंत दिले असल्याचे माहिती मिळाली आहे. म्हणून हे आंदोलन तात्पुरते स्थगित करीत आहोत. पूर्णपणे रद्द केलेले नाही. शाळेतील शिक्षकांची संख्या पुन्हा कमी झाल्यास आम्ही कोणतीही पूर्व सूचना देता शाळेला टाळे लावण्याच्त येईल. अशी भूमिका सर्व नगरसेवकांनी जाहीर केली.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सविता भोसेकर यांनी शाळेतील काही नियमांचे आंदोलनाच्या निमित्ताने शाळा व्यवस्थापन समितीचे काही ठराव करण्यात आले. ते देखील यावेळी वाचून दाखवले. त्यास, पालक, नगरसेवक व विद्यार्थी यांना हात उंचावून पाठिंबा दिला.

शाळा व्यवस्थापन समितीचे ठराव

- नवीन सर्व शिक्षकांचे अभिनंदन आणि स्वागत करीत आहे.

- आज रुजू झालेले काही शिक्षक हे तात्पुरते‌ दिले‌‌ आहेत.‌ अशी माहिती मिळाली आहे. म्हणून आम्ही हे‌ आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. रद्द केलेले नाही.

- आमच्या शाळेची शिस्त कायम‌ ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करावे

- शिक्षकांनी सोमवारी ते शुक्रवारी सकाळी सात ते दुपारी एक व शनिवारी सकाळी‌‌ सव्वा अकरा ते दुपारी‌ साडेतीन या वेळेत उपस्थित रहावे.

- शिक्षकांनी रोज नियमितपणे अध्यापनाचे काम पूर्ण करावे. मुलांना रोज गृहपाठ द्यावा.

- तसेच मुलांच्या कलागुणांचा विकास होईल यासाठी आपण प्रयत्न करावे.

- केंद्र,‌ राज्य सरकार, पालिका, शिक्षण विभाग आणि शाळा‌ व्यवस्थापन समितीच्या सूचना, नियमावली यांचे पालन करावे.

- अध्यापनासोबत असलेली‌ शासकीय कामकाज पूर्ण करावीत.

- आज रुजू, हजर शिक्षकांचा शाळेत प्रशासकीय किमान कालावधी पूर्ण करावा. त्याच्या बदलीबाबत काही आदेश सुचना आल्यास त्याची माहिती तातडीने समितीला द्यावी.

- सर्व ठराव आम्ही व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीत बहुमताने मंजूर करीत आहोत.

बराटे म्हणाले, पालक, पालिका शिक्षण विभागाचे अधिकार पोलिस उपस्थित नसल्याचे निषेध व्यक्त केला. शिक्षण विभागाने सात शिक्षक दिले आहेत. आता आमचा लढा‌ पट संख्येप्रमाणे शिक्षक मिळत नाही. तोपर्यंत सुरू राहील.

धुमाळ म्हणाले, शिक्षक मिळण्यासाठी आपण पाठपुरावा केला. टाळे लावण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेतली आहे.

दोडके म्हणाले, शाळा इमारत उभी करणं सोपं असतं शैक्षणिक दर्जा, विद्यार्थी संख्या टिकवणे शिक्षकांच्या हातात असतं. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये. म्हणून शिक्षकांसाठी पालक व लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन पाठपुरावा केल्याने शाळेला सात शिक्षक मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com