Video : खादी ग्रामोद्योगातून पाच कोटी तरुणांना रोजगार देणार : नितिन गडकरी

Khadi Gramodyog will provide 5 crore employment to youth says Nitin Gadkari
Khadi Gramodyog will provide 5 crore employment to youth says Nitin Gadkari

पुणे : देशाच्या एकूण सकल उत्पन्नाच्या तुलनेत कृषी, खादी ग्रामोद्योग आणि लघु उद्योगाचा २९ टक्के वाटा आहे. यातून अकरा कोटी तरूणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. खादी ग्रामोद्योगातून सुमारे ७५ हजार कोटी रूपयांची आर्थिक उलाढाल आहे. येत्या पाच वर्षात ती पाच लाख कोटी रूपयांपर्यत नेण्यासोबतच पाच कोटी तरूणांना रोजगार देण्याचे केंद्र सरकारचे उद्दीष्ठ आहे. हे उद्दीष्ट मध उत्पादन, बांबू आणि मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

केंद्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण केंद्राला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी (ता.६) भेट दिली. यावेळी ते बोलत होते. या वेळी खादी ग्रामोद्योगचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय हेडाव, खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. सी. केरकटा, खादी ग्रामोद्यागाच्या केंद्रीय मधमाशीपालन संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ. संजीब रॉय, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, डॉ. एम.टी. वाकोडे, वैज्ञानिक डॉ. आर. पी. फडके, के. के. क्षीरसागर, डॉ. लक्ष्मी राव, डॉ. थॉमस राजेंद्र कणसे आदी उपस्थित होते.

केवळ मुख्यमंत्रिपदासाठी सेनेने भगव्याशी तडजोड केली : गडकरी

गडकरी म्हणाले, `ग्रामीण, आदिवासी भागात जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरूणांना रोजगारासाठी शहरात जाण्याची गरज भासणार नाही. त्यासाठी कृषी, वन उत्पादन आणि प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यात येणार आहे. यामध्ये बांबूपासून तेल तयार करणे, बांबू उत्पादने, बायोडिझेल, बायोमास असे प्रक्रिया उद्योग सुरू करता येऊ शकतात. तसेच, क्लस्टर उद्योग तयार करून मधमाशीज्ञपालनाला चालना देता येईल. त्यासाठी केद्र सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी व सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. गेल्या वर्षीपासून बायोएव्हीशन फ्युअलचे उत्पादन वाढविण्यात येत आहे. भविष्यात बायोएव्हीएशन फ्युअलच्या निर्यातीवर होणारा खर्च कमी करता येईल. मधापासून क्युब तयार करण्यासाठी संशोधन सुरू आहे. तसेच विमानातील प्रवाशांना साखरेऐवजी मधापासून तयार करण्यात आलेल्या सॅशे देण्याबाबत विमान कंपन्याची चर्चा सुरू आहे.

मत्सव्यवसायिकांना सध्या समुद्रात दहा नॉटिकल अंतरापर्यत मासेमारी करता येते. मत्स्यव्यवसायालाही चालना देण्यासाठी मत्स व्यावसायिकांना अत्याधुनिक ट्रॉलर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना समुद्रात शंभर नॉटिकल अंतरापर्यत जाऊन मासेमारी करता येईल. आयुर्वेदिक औषधाची व हर्बलची उलाढाल सुमारे वीस हजार कोटी रूपये आहे. हे एक लाख कोटी रूपयांपर्यत नेण्याचे उद्दीष्ट आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. ग्रामीण उद्योगातून पाच लाख कोटीचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आणि तरूणांना रोजगार देण्यासाठी बॅक आँफ आयडीयाज इनोव्हेशन अँण्ड रिसर्च पोर्टल सुरू करीत आहोत. त्यासोबतच मार्केटिंग करण्यासाठी टपाल खात्याला जोडणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com