केवळ मुख्यमंत्रिपदासाठी सेनेने भगव्याशी तडजोड केली : गडकरी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 January 2020

केवळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून शिवसेनेने भगव्याशी तडजोड केली असल्याची टीका भाजपनेते आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. शिवसेनेने त्यांच्या विचारधारेशी तडजोड केली. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तेसाठी एकत्र आले. शिवसेनेने याआधी फक्त भगवा फडकवण्याची भाषा केली होती. मात्र आता शिवसेना काँग्रेससोबतच्या रंगात मिसळली असल्याचेही ते बोलले. नागपूर येथिल एका कार्यक्रमात ते बोलत होते.

नवी दिल्ली : केवळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून शिवसेनेने भगव्याशी तडजोड केली असल्याची टीका भाजपनेते आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. शिवसेनेने त्यांच्या विचारधारेशी तडजोड केली. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तेसाठी एकत्र आले. शिवसेनेने याआधी फक्त भगवा फडकवण्याची भाषा केली होती. मात्र आता शिवसेना काँग्रेससोबतच्या रंगात मिसळली असल्याचेही ते बोलले. नागपूर येथिल एका कार्यक्रमात ते बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भाजप सेना युतीला महाराष्ट्राच्या जनतेने जनमत दिलेले असताना शिवसेनेला सुरुवातीची मुख्यमंत्रिपदाची अडीच वर्षे द्यायची अशी आग्रही मागणी शिवसेनेने पहिल्या दिवसापासून लावून धरली होती. यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये काडीमोड झाला. त्यानंतर सुमारे महिनाभर झालेल्या घडामोडी महाराष्ट्रानेही पाहिल्या आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नेमक्या या सगळ्या मुद्द्यावर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टीका केली आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल २४ ऑक्टोबर रोजी लागले. या निकालांमध्ये खरंतर जनमताचा कौल हा भाजपा शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीला होता. मात्र अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावर शिवसेना अडून बसली. शिवसेनेने मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी विचारधारेशी तडजोड केली असल्याचेही नितीन गडकरी यांनी म्हटले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena compromised with its ideology for chief minister post says Gadkari