esakal | ...अन् मासे पकडण्यासाठी गेलेला 'मुन्ना' पाण्यात अडकला
sakal

बोलून बातमी शोधा

...अन् मासे पकडण्यासाठी गेलेला 'मुन्ना' पाण्यात अडकला

...अन् मासे पकडण्यासाठी गेलेला 'मुन्ना' पाण्यात अडकला

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी : नांदेड-शिवणे पुलापासून काही अंतरावर शिवणे येथे राहणारा मुन्ना धानुराज (मुळ रा. मध्यप्रदेश) हा व्यक्ती मासे पकडण्यासाठी मुठा नदीपात्रात उतरला होता. मासे पकडण्याच्या नादात तो पुढे पुढे सरकत होता. दुपारच्या सुमारास खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात सुमारे साडेतीन हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने अचानक पाण्याची पातळी वाढली. काही कळण्याच्या आत पाण्याचा प्रवाह वाढल्याने मुन्ना जीव वाचविण्यासाठी खडकावर चढला व जोर जोराने ओरडू लागला.

नांदेड सिटीला लागून असलेल्या स्वामी समर्थ मठात निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार करत असलेल्या आर्य नरसिंग लगड या तरुणाने नदीपात्राच्या बाजूने येत असलेला ओरडण्याचा आवाज ऐकला. आर्य लगड याने मठातील रमेश दायमा,अनिल बेनकर व बापू ढेबे यांना नदीत कोणीतरी अडकल्याचे सांगितले. चौघांनीही मठाच्या कुंपणातून खाली नदीकाठावर जाऊन पाहिले असता नदीपात्रात खडकावर उभा राहून एक व्यक्ती जीवाच्या आकांताने ओरडत होता.

हेही वाचा: ठरलं! भुपेंद्र पटेल होणार गुजरातचे मुख्यमंत्री

आर्य व सोबतच्या तिघांनी त्या व्यक्तीला धीर दिला व खडकावरून हळूहळू कडेला येण्यास सांगितले. मठात असलेला लांब बांबू आणला व बांबूच्या सहाय्याने त्या व्यक्तीला सही सलामत पाण्याच्या बाहेर काढले. घाबरलेल्या व्यक्तीने त्याचे नाव मुन्ना धानुराज व शिवणे येथे राहण्यास असल्याचे सांगितले. आर्यच्या प्रसंगावधानामुळे मुन्नाचे प्राण वाचले. काळ आला होता पण वेळ नाही!

loading image
go to top