

Merger of Pune and Khadki Cantonment Still Pending
Sakal
पुणे : पुणे व खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचा नागरी परिसर महापालिकेत विलीनीकरण करण्यास राज्य सरकारने तत्त्वतः मान्यता दिली. त्यास चार महिने उलटून गेले, मात्र अजूनही विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडून संरक्षण मंत्रालयाकडे सध्या पाठपुरावा सुरू आहे. कॅंटोन्मेंट बोर्डांची महापालिकेत विलीनीकरणाची प्रक्रिया नव्या वर्षात तरी पूर्ण होणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.