Trusted acquaintance steals gold jewelry from a household container in Khadki
पुणे : कपाटात ठेवलेले दागिने चोरीला जातील या भीतीने एका महिलेने आपले सोन्याचे दागिने ‘पिंपात’ सुरक्षित ठेवण्याचा अनोखा मार्ग अवलंबला; मात्र हा उपायही फसला. विश्वासातील महिलेनेच पिंपातील दागिन्यांवर हात साफ करून एक लाख ९७ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना खडकीतील इंदिरानगर परिसरात घडली. या प्रकरणी ३७ वर्षीय महिलेने खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी महिलेसह तिच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.