

Swift Police Action in Khanapur: Robbers Nabbed Within 48 Hours
पुणे : पानशेत रस्त्यावर खानापूरमध्ये असलेल्या एका सराफी पेढीवर दरोडा टाकून सव्वा कोटीचे दागिने लुटणाऱ्या चोरट्यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून ७० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ग्रामीण पोलिसांनी ४८ तासांत ही कामगिरी केली.