

Bold Daytime Heist at Vaishnavi Jewelers in Khanapur
Sakal
खडकवासला : हवेली तालुक्यातील सिंहगड पायथ्याजवळील खानापूर येथे शुक्रवारी (ता. २६) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास दोन दुचाकींवरून आलेल्या पाच जणांनी तोंडाला रुमाल बांधून आणि कोयत्याचा धाक दाखवत वैष्णवी ज्वेलर्स या सोन्या–चांदीच्या दुकानावर धाडसी दरोडा टाकला. यात सुमारे एक कोटी रुपये किंमतीचे अंदाजे ७० ते ८० तोळे सोन्याचे दागिने लुटून आरोपी पसार झाले. हवेली पोलिसांसह पुणे ग्रामीण पोलिस दल आरोपींचा कसून शोध घेत आहे.