कडधेच्या यात्रेत धावले २७५ बैलगाडे
चास, ता. ४ : कडधे (ता. खेड) येथे खंडोबा देवाचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. दोन दिवस चाललेल्या या उत्सवाचे आकर्षण ठरलेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये पहिल्या दिवशी फायनल शर्यत समाधान येळवंडे, दुसऱ्या दिवशी उल्हास गणपत हुंडारे यांच्या गाड्याने जिंकली. तर घाटाचा राजा बहुमान अरबुज कोहीणकर जुगलबंदी, अक्षय खंडू नाईकडे, स्वराज संतोष भोर तसेच काळभैरवनाथ बैलगाडा संघटना यांच्या गाड्याने प्राप्त केले. यावेळी २७५ बैलगाडे धावले.
दरवर्षीप्रमाणे कडधे येथे साजऱ्या झालेल्या या उत्सवाची सुरूवात देवाला पहाटे अभिषेक, हारतुरे अर्पण करून झाली. त्यामध्ये पहिल्या दिवशी फळीफोड प्रथम क्रमांक खंडू लक्ष्मण नाईकडे यांच्या गाड्याने, व्दितीय रोहित विजय आल्हाट यांच्या गाड्याने, तृतीय विश्वनाथ शिवाजी कडलग यांच्या गाड्याने प्राप्त केला. फायनल शर्यतीत पहिल्यात पहिला क्रमांक समाधान येळवंडे, दुसरा आरबुज कोहीणकर जुगलबंदी यांच्या गाड्याने तर तृतीय क्रमांक सुनील आनंदा शिंदे व हिंदवी वडेवाले जुगलबंदी यांच्या गाड्याने प्राप्त केला.
दुसऱ्या दिवशी झालेल्या शर्यतीत प्रथम क्रमांक शंकर लक्ष्मण राक्षे व शुभम बोऱ्हाडे जुगलबंदी यांच्या गाड्याने, व्दितीय अनिकेत सुरेश मेंगडे यांच्या गाड्याने तर तृतीय क्रमांक सुदाम बाळू पारधी यांच्या गाड्याने प्राप्त केला. फायनल शर्यतीत प्रथम क्रमांक उल्हास गणपत हुंडारे, व्दितीय क्रमांक अक्षय नाईकडे व सुभाष भोर जुगलबंदी तर तृतीय क्रमांक भावेश चव्हाण, आद्या आसवले जुगलबंदी यांच्या गाड्याने प्राप्त केला. घाटाचा राजा बहुमान अक्षय खंडू नाईकडे, स्वराज संतोष भोर व काळभैरवनाथ बैलगाडा संघटना यांच्या गाड्याने मिळवला. बैलगाडा घाटात अलाऊंसर म्हणून पंकज शिंदे, माउली तळेकर, दामू लांडगे व शिवाजी कावडे यांनी काम पाहिले. शुभम नाईकडे, शिवाजी नाईकडे व बाळासाहेब नाईकडे यांनी वेळेच्या नियंत्रणाचे काम उत्तम पार पाडले. उत्सवाचे नियोजन कडधे ग्रामस्थ, श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट, मुंबईकर व पुणेकर मंडळ, समस्त यात्रा कमेटी, सर्व तरुण मंडळे यांच्या वतीने करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

