

वडगाव शेरी, ता. १७ : खराडी बाह्यवळण चौकात पडलेला खड्डा पाणीगळतीमुळे नव्हे, तर बांधकाम प्रकल्पाच्या तळघरातील पाणी रस्त्यावर सोडल्यामुळे पडल्याचे अखेर उघडकीस आले आहे. मात्र, याप्रकरणी महापालिकेने संबंधित बांधकाम व्यावसायिकाला केवळ सक्त ताकीद दिली असून, अद्याप कोणतीही दंडात्मक कारवाई केलेली नाही.
खराडी बाह्यवळण चौकात पाणीगळतीमुळे मोठा खड्डा पडल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर नगर रस्ता व येरवडा क्षेत्रीय कार्यालयासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळी जाऊन पाणीगळतीचा स्रोत शोधण्यास सुरुवात केली.
त्यावेळी चौकाजवळील एका बांधकाम प्रकल्पाच्या तळघरातील पाणी रस्त्यावर सोडले जात असल्याचे निदर्शनास आले. रात्रीच्या वेळी हे पाणी रस्त्यावर सोडले जात होते. संबंधित वाहिनी बंद असल्याने पाण्याचा निचरा होत नव्हता. परिणामी, पाणी रस्त्यावर साचत होते.
याप्रकरणी संबंधित बांधकाम व्यावसायिकाला केवळ सक्त ताकीद देण्यात आल्याचे कनिष्ठ अभियंता फारुख पटेल यांनी सांगितले. मात्र, रस्त्यावर पाणी सोडल्याप्रकरणी संबंधित बांधकाम प्रकल्पावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे उपअभियंता गौरी गवते यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.