
पुणे : खराडीतील हॉटेल स्टेबर्डमध्ये झालेल्या अमली पदार्थ पार्टीतील आरोपी डॉ. प्रांजल खेवलकर याच्या मोबाईलमध्ये लपवलेल्या फाइलमधील अनेक फोटो आणि व्हिडिओ मिळून आले आहेत. त्यात खेवलकर यांनी वेगवेगळ्या महिलांबरोबर पार्टीमध्ये आणि पार्टीनंतर केलेल्या गैरकृत्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटोंचा समावेश आहे. खेवलकर वेगवेगळ्या मित्र-मैत्रिणींसह गेल्या दीड वर्षात ४३ दिवस हॉटेलमध्ये राहिला आहे. अटक आरोपींपैकी एकाने खेवलकरला सिगारेटचा फोटो पाठवून माल पाहिजे का, असे विचारले असता, त्याने होकारार्थी उत्तर दिले. त्या माध्यमातून पार्टीत अमली पदार्थ आणल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी न्यायालयास दिली.