

Structural Audit Needed for Jackwell Bund Bridge
Sakal
खराडी : केशवनगर आणि खराडी या भागांना जोडणारा जॅकवेल बंधारा पाणी अडविण्याच्या उद्देशाने बांधण्यात आला होता. परिसरात नागरी वस्ती वाढल्याने आता त्यावरून त्यावेळी अपेक्षितपेक्षा अधिक वाहतूक होत आहे. त्यामुळे वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा पूल योग्य की अयोग्य याविषयी जनसामान्यांना माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे या बंधाऱ्यावरील पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिक करत आहेत.