
Kharadi Rave Praty Raid : पुण्यात खराडी परिसरात रेव्ह पार्टीत छापा टाकून पोलिसांनी ७ जणांना अटक केलीय. घटनास्थळी गांजा, हुक्का पॉट आणि दारुच्या बाटल्या आढळून आल्यात. दरम्यान, खराडीत पार्टी करण्याआधी आरोपींनी रात्रभर दोन पार्ट्या केल्या होत्या. त्यानंतर आफ्टर पार्टीसाठी ते खराडीत आले होते अशी माहिती आता समोर आली आहे. पबमध्ये पार्टी केली, पण पब बंद झाल्यानं फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये दुसऱ्या पार्टीसाठी गेले. तिथेही ३ वाजता हॉटेल बंद झाल्यानं पहाटे आफ्टर पार्टीसाठी खराडीत आल्याचं आता उघड झालंय.