

Pune Land Scam: Kharge Panel Urges State Govt to Permanently Sack Corrupt Officers
sakal
पुणे : शासकीय जमिनींची अनधिकृत खरेदी-विक्री दस्त नोंदविणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हा नोंद करून सेवेतून कायमचे बडतर्फ करण्याची तरतूद ‘सेवा अधिनियमात’ करावी, अशी महत्त्वपूर्ण शिफारस अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या समितीने राज्य सरकारला केली आहे. भविष्यात मुंढवा जमीन गैरव्यवहारासारखे प्रकार टाळण्यासाठी समितीने अनेक महत्त्वपूर्ण शिफारशी सरकारला केल्या आहेत.