Crop Loan : खरिपासाठी एकाच महिन्यात पावणे पंधराशे कोटींचे पीककर्ज

पुणे जिल्ह्यातील यंदाच्या खरीप हंगामातील स्थिती; १ एप्रिलपासून वाटप सुरु
kharif crop loan 1500 cr distribution agriculture farmer pune
kharif crop loan 1500 cr distribution agriculture farmer puneSakal

Pune News : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने (पीडीसीसी) चालू वर्षीच्या खरीप हंगामासाठी गेल्या एकाच महिन्यात १ हजार ४७८ कोटी ४१ लाख ३१ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. पुणे जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ७८.२२ टक्के इतके पूर्ण झाले आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ४५ हजार ३१९ शेतकऱ्यांना या पीक कर्जाचा लाभ मिळाला आहे.यंदाच्या खरीप हंगामातील पिकांसाठी १ एप्रिल २०२४ पासून पीक कर्ज वाटपास सुरुवात झाली आहे. खरिपासाठी येत्या ३० सप्टेंबरपर्यंत पीक कर्जाचे वाटप केले जाणार आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांसाठी जिल्हा बॅंकेने यंदा १ हजार ८९० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यानुसार जिल्ह्यातील मागेल त्या पात्र शेतकऱ्यांना या पीक कर्जाचा लाभ दिला जाणार आहे.

शिवाय यावर्षीही तीन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जासाठी शून्य टक्के व्याजाची योजना चालू ठेवण्यात आली आहे. मागील पंधरा वर्षापासून पुणे जिल्हा बॅंकेच्यावतीने शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजाने वितरित केले जात असल्याचे जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी शनिवारी (ता.५) सांगितले.

जिल्ह्यातील खरीप पीक कर्ज दृष्टीक्षेपात...

खरिपासाठी पीक कर्ज वाटपाचे एकूण उद्दिष्ट --- १ हजार ९०० कोटी रुपये

आतापर्यंत प्रत्यक्षात पूर्ण झालेले वाटप --- १ हजार ४७८ कोटी ४१ लाख ३१ हजार रुपये

पीक कर्जाचा लाभ घेतलेले एकूण शेतकरी --- १ लाख ४५ हजार ३१९

पीक कर्जाचा लाभ झालेले क्षेत्र --- १ लाख २० हजार ३१४ हेक्टर

तालुकानिहाय पीक कर्ज वाटप (रुपयांत)

- आंबेगाव --- १२२ कोटी ७१ लाख ७५ हजार

- बारामती --- १९५ कोटी ३३ लाख ०२ हजार

- भोर --- ६९ कोटी ६२ लाख ८३ हजार

- दौंड --- २२८ कोटी ०३ लाख ६० हजार

- हवेली --- ५६ कोटी ०४ लाख ७६ हजार

- इंदापूर --- ९० कोटी ६० लाख ४२ हजार

- जुन्नर --- १८० कोटी ९५ लाख ३५ हजार

- खेड --- १२७ कोटी ७४ लाख ६८ हजार

- मावळ --- २६ कोटी २१ लाख ०९ हजार

- मुळशी --- १४ कोटी ८६ लाख ५६ हजार

- पुरंदर --- १४२ कोटी ६२ लाख ४२ हजार

- शिरूर --- २१० कोटी ८४ लाख ५३ हजार

- वेल्हे --- १२ कोटी ८० लाख १८ हजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com