खातगाव नं 1शाळेतील विद्यार्थ्यांची नावे पाठवली जाणार थेट चंद्रावर नासाच्या आवाहनाला खातगाव 1 शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
खातगावच्या विद्यार्थी अन् शिक्षकांची नावे जाणार थेट चंद्रावर
नासाच्या आर्टेमिस मोहिमेत असणार व्हर्चुअल सहभाग; नासाने पाठविले बोर्डिंग पास
सकाळ वृत्तसेवा
करमाळा, ता. ६ : खातगाव नं. १ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील २३ विद्यार्थी व दोन शिक्षकांची नावे थेट चंद्रावर पाठवली जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्था अर्थात नासाच्या आर्टेमिस- २ मोहिमेत व्हर्चुअल गेस्ट म्हणून सहभागी होण्याबाबत आवाहन केले होते. या उपक्रमात खातगाव नं.१ शाळेने विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची ऑनलाइन पद्धतीने यशस्वीरीत्या नोंदणी केल्यानंतर नासाकडून त्यांना बोर्डिंग पास पाठविण्यात आले आहेत. त्यानुसार ऐतिहासिक सहभाग नोंदविला जाणार आहे. ही गोष्ट शाळेच्या वैभवात भर टाकणारी आहे.
तब्बल ५४ वर्षांनी नासा चंद्रावर चार अंतराळवीर पाठवणार आहे. या विद्यार्थ्यांची नावे एका एसडी कार्डमध्ये संग्रहित करून ओरियन यानाद्वारे चंद्राकडे पाठविले जाणार आहेत. यामध्ये समीना शेख, रुकसार शेख, शुभांगी पल्लारे, तेजस कोकरे, कार्तिकी कोकरे, गणेश आरदड, सफिया शेख, राधिका कोकरे, सार्थक वाघमोडे, कल्याणी आरदड, अक्षरा कोकरे, श्रेया कोकरे, वेदिका धायगुडे, श्रेयश धायगुडे, करण पल्लारे, शिवराज कवडे , जयवर्धन झेंडे, राजवीर गुळवे, दिलशाद शेख, तनुजा कोकरे, श्रेया झेंडे, वेदिका कोकरे, आदित्य कोकरे या विद्यार्थ्यांचे व शिक्षक बाळासाहेब बोडखे आणि बिभीषण सातपुते यांच्या नावांचा समावेश आहे.
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आयसीटी शिक्षक विक्रम आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक बाळासाहेब बोडखे यांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी एक पाऊल म्हणून यामध्ये सहभाग नोंदवला आहे. आर्टेमिस-२ ही मोहीम एप्रिल २०२६ पूर्वी फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटर इथून प्रक्षेपित होईल. अंतराळवीर चंद्राच्या पलीकडे सुमारे ६ लाख ८५ हजार मैलाचा प्रवास करून पॅसिफिक महासागरात परतणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

