फास्टटॅग असूनही जावे लागते ‘स्लाे’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

 पुणे-सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर टोल नाक्‍यावर बुधवारपासून फास्टटॅगद्वारे टोलवसुली बंधनकारक करण्यात आली. मात्र, फास्टटॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडण्यात येत होती. त्यामुळे फास्टटॅग असूनही रांगेत थांबावे लागत असल्याने फास्टटॅगधारक वाहनचालक नाराजी व्यक्त करत होते.  

खेड-शिवापूर टोल नाका
खेड शिवापूर - पुणे-सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर टोल नाक्‍यावर बुधवारपासून फास्टटॅगद्वारे टोलवसुली बंधनकारक करण्यात आली. मात्र, फास्टटॅग मार्गिकेतून इतर वाहनेही सोडण्यात येत होती. त्यामुळे फास्टटॅग असूनही रांगेत थांबावे लागत असल्याने फास्टटॅगधारक वाहनचालक नाराजी व्यक्त करत होते.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सर्व टोल नाक्‍यांवर १ डिसेंबर २०१९ पासून फास्टटॅगच्या माध्यमातून टोल भरणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर या मुदतीत वाढ करून ही मुदत १५ जानेवारीपर्यंत वाढविली होती. त्यानुसार बुधवारपासून खेड शिवापूर टोल नाक्‍यावर फास्टटॅगच्या माध्यमातून टोलवसुली सुरू केली. बुधवारी मध्यरात्रीपासून या टोल नाक्‍यावर फास्टटॅग यंत्रणा कार्यान्वित केली होती. दोन्ही टोल नाक्‍यांवरील सर्व मार्गिका फास्टटॅग केल्या आहेत; तर दोन्ही टोल नाक्‍यांवर प्रत्येकी एक मार्गिका रोख स्वरूपात टोल देणाऱ्या वाहनांसाठी ठेवली आहे. फास्टटॅग नसलेल्या वाहनांकडून दुप्पट टोल आकारण्यात येणार असल्याचे ‘एनएचएआय’ने सांगितले होते. त्यानुसार खेड शिवापूर टोल नाक्‍यावरही बुधवारी फास्टटॅग नसलेल्या वाहनांना दुप्पट टोल आकारण्यात येत होता. मात्र, फास्टटॅगधारक वाहनांच्या तुलनेत फास्टटॅग नसलेल्या वाहनांची संख्या जास्त असल्याने गुरुवारी खेड शिवापूर टोल नाक्‍यावर इतर वाहनेही फास्टटॅग मार्गिकेतूनच सोडण्यात येत होती. त्यामुळे फास्टटॅगधारक वाहनांना टोल नाक्‍यावर थांबावे लागल्याने वाहनचालक नाराजी व्यक्त करत होते.

बुधवारी रस्त्यावर साधारण वाहतूक असल्याने फास्टटॅग यंत्रणा सुरळीत चालली. मात्र, वाहतूक जास्त असल्यावर फास्टटॅग यंत्रणेवर ताण येईल. फास्टटॅग यंत्रणा सुरळीत सुरू राहण्यासाठी प्रत्येकाने आपल्या वाहनांना फास्टटॅग बसविणे गरजेचे आहे.
- अमित भाटिया, पुणे-सातारा टोलचे महाव्यवस्थापक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khed shivapur Toll naka FastTag

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: