esakal | लक्झरी बसमूधन चरस जप्त; खेड शिवापूर टोलनाक्याजवळ कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

लक्झरी बसमूधन चरस जप्त; खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ कारवाई

मुंबईहुन गोव्याला जाणाऱ्या लक्झरी बसमधून एक इसम चरसची वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

लक्झरी बसमूधन चरस जप्त; खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ कारवाई

sakal_logo
By
महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर, ता. 8 : मुंबईहून गोव्याला निघालेल्या लक्झरी बसमधून राजगड पोलिसांनी शुक्रवारी पहाटे पुणे-सातारा रस्त्यावर सुमारे बत्तीस लाख रुपये किमतीचा सुमारे सहा किलो चरस जप्त केला आहे. याप्रकरणी मुस्ताकी रजाक धुनिया (वय 30, रा. नेपाळ) यास ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली. मुंबईहुन गोव्याला जाणाऱ्या लक्झरी बसमधून एक इसम चरसची वाहतूक करत असल्याची माहिती राजगडचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार राजगड पोलिसांनी शुक्रवारी पहाटे खेड-शिवापूर टोल नाक्यावर सापळा रचला होता. पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास टोल नाक्यावर एक संशयित लक्झरी बस बाजूला घेऊन तपासणी केली असता त्यातील धुनिया याच्याकडे चरस आढळून आला. त्याच्याकडून सुमारे बत्तीस लाख रुपये किमतीचा एकूण सहा किलो चरस जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी धुनिया याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज अवसरे, फौजदार श्रीकांत जोशी, निखिल मगदूम, पोलिस हवलदार संतोष तोडकर, सोमनाथ जाधव, पी. एस. निकम, अजित माने, भगीरथ घुले, नाना मदने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

loading image
go to top