
खेड शिवापूर : गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना शासनाने टोलमाफीचा निर्णय घेतला असला तरी खेड शिवापूर टोलनाक्यावर शनिवारी (ता. २३) वसुली सुरू होती. त्यानंतर सायंकाळी पासधारकांना सोडण्यात येत होते. मात्र, अनेक वाहन चालकांनी पास आणले असले तरी काही प्रवाशांच्या वाहनांना फास्टटॅग असल्याने स्वयंचलित यंत्रणेद्वारे टोल आकारणी होत आहे, त्यामुळे भांडणे काही थांबत नव्हते.