

A two-year-old girl died after allegedly drowning in a rainwater-filled pit near her house in Daund taluka of Pune district.
Sakal
खुटबाव : खुटबाव ( ता . दौंड) परिसरातील साळोबावस्ती येथील चिमुकली आरोही अशोक शिंदे (वय २ वर्षे) हिचा घराशेजारील तीन फुट खोल डबक्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.सदर घटना मंगळवार दिनांक १४ रोजी सकाळी ११.०० वाजता घडली. मुरूम काढण्याच्या उद्देशाने सदर खड्डा शिंदे यांच्या घराच्या पूर्वेला खणण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या पावसाने या खड्ड्यामध्ये पाणी साठले होते.