अपहरण झालेली चिमुकली अखेर आईच्या कुशीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur crime case
अपहरण झालेली चिमुकली अखेर आईच्या कुशीत

अपहरण झालेली चिमुकली अखेर आईच्या कुशीत

पुणे : प्रेमसंबंधांतून जन्माला आलेल्या व मित्राच्या ताब्यात असताना अपहरण झालेल्या चिमुकलीचा ताबा अखेर तिच्या आर्इला मिळाला. मुलीचे अपहरण केलेल्या महिलेला अटक करून पोलिसांनी मुलीचा ताबा एका सामाजिक संस्थेकडे दिला होता. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर संस्था आणि मुलीचे आर्इ-वडील यांची बाजू ऐकून घेत आईला मुलीचा ताबा देण्यात आला.

रेश्‍मा असे या आईचे नाव आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तिचे अशोक बरोबर (दोन्ही नावे बदललेली) प्रेम संबंध निर्माण झाले. त्यांच्या झालेल्या शरिरसंबंधातून रेश्‍मा ही गर्भवती राहिली होती. मात्र त्यांच्या संबंधाला घरच्यांचा विरोध होईल या भीतीतून त्यांनी मुलीचा जन्म झाल्यानंतर तिला त्यांच्या मित्राकडे सांभाळण्यास दिले. मुलीचा काही दिवस सांभाळल्यानंतर पुन्हा परत देण्याचे आश्वासन त्या मित्राने रेश्‍मा आणि अशोक यांना दिले होते. यादरम्यान, त्या चिमुकलीचे अपहरण झाले.

काही कालावधीनंतर मुलीचे अपहरण केलेल्या महिलेला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा ताबा आळंदीतील एका शिशूगृहाकडे देण्यात आला. आपली मुलगी शिशूगृहात असल्याचे कळाल्यानंतर या जोडप्याने मुलीचा ताबा घेण्यासाठी बालकल्याण समिती, येरवडा यांकडे अर्ज केला. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेशिवाय ताबा देण्यास संस्थेने नकार दिला. त्यानंतर त्यांनी अ‍ॅड. सोपान पाटील आणि अ‍ॅड. मनीष ननावरे यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने त्यांची बाजू ऐकून घेत आईला मुलीचा ताबा देण्याचे आदेश दिले.

Web Title: Kidnapped Chimukali Born Girl Love Affair Was Abducted Custody Friend Finally Handed Over Her Mother

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top