अपहरण केलेल्या जोगत्याचा ताम्हिणी घाटात गोळी झाडून खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shooting
अपहरण केलेल्या जोगत्याचा ताम्हिणी घाटात गोळी झाडून खून

अपहरण केलेल्या जोगत्याचा ताम्हिणी घाटात गोळी झाडून खून

पुणे - वारजे परिसरातून अपहरण झालेल्या जोगत्याचा ताम्हिणी घाटात गोळी झाडून खून केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. वारजे पोलिसांनी दोन दिवस ताम्हिणी घाटाचा परिसर पिंजून काढल्यानंतर अखेर शनिवारी दुपारी मृतदेह सापडला. याप्रकरणी वारजे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. आर्थिक वादातून हा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

गजानन हवा (वय 38, रा. वारजे) असे खून झालेल्याचे नाव आहे. हवा याचे बुधवारी अपहरण झाल्याप्रकरणी गुन्हा वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरु केला होता. दरम्यान हवा याचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र त्याचा मृतदेह मिळून येत नव्हता. अपहरण झालेल्या हवा याचा मोबाईलही बंद लागत होता.

दरम्यान, पोलिसांनी हवा याच्या सोबत गेलेल्या दोघाना संशयाच्या कारणावरून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत हवा याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले, त्यानंतर त्याचा मृतदेह ताम्हिणी घाटात पुरून टाकल्याची माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर कटके, पोलिस उपनिरीक्षक नरेन मुंडे यांच्या पथकाने ताम्हिणी घाटाचा परिसर पिंजून हवा याचा मृतदेह शोधून काढला.