अपहरण व खंडणी प्रकरणी महाजनांच्या निकटवर्तीयांच्या घरी झाडाझडती

कोथरुड पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा, पुणे पोलिसांच्या विशेष पथकाकडून रविवारी रात्री उशीरापर्यंत कारवाई
Kidnaping
Kidnapingsakal

पुणे : जळगावमधील एक शैक्षणिक संस्था ताब्यात घेण्यासाठी संस्थेच्या संचालकाचे अपहरण(Kidnapping) व खंडणीप्रकरणी(Ransom) कोथरुड पोलिस ठाण्यात मागील वर्षी भाजप (BJP)नेते गिरीश महाजन यांच्यासह 29 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणातील महाजन यांचे निकटवर्तीय असलेल्या पाच जणांच्या घरी पुणे पोलिसांच्या पथकाने छापा टाकला, त्यानंतर रविवारी रात्री उशीरापर्यंत पाचही जणांच्या घराची झडती घेण्याचे काम सुरु होते.

Kidnaping
निर्बंध शिथिल न केल्यास उपोषण करू; महाबळेश्‍वरातील व्यापाऱ्यांचा इशारा

ऍड.विजय पाटील (वय 52) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात जानेवारी 2021 मध्ये फिर्याद दिली होती. त्यावरुन गिरीश दत्तात्रेय महाजन (रा. जामनेर, जळगाव), तानाजी भोईटे (रा. कोंढवा), नीलेश भोईटे, वीरेंद्र भोईटे (रा. भोईटेनगर जळगाव) यांच्यासह 29 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पाटील हे जळगावमधील जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित शैक्षणिक संस्थेचे संचालक आहेत. संबंधित संस्था महाजन यांना पाहिजे होती, त्यासाठी त्यांनी पाटील यांना एक कोटी रुपये देण्याचे आमिष दाखविले. मात्र, पाटील यांनी त्यास नकार दिला. दरम्यान, संशयित आरोपींनी पाटील यांना संस्थेसंबंधी कागदपत्रे देण्याचा बहाणा करून पुण्यात बोलाविले. त्यांना व त्यांच्या समवेतच्या एका व्यक्तीला सदाशिव पेठेतील एका सदनिकेत नेऊन दोघांचे हात-पाय बांधून त्यांना डांबुन ठेवले.

Kidnaping
विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नका! शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद

त्यानंतर त्यांना जबर मारहाण करुन मारहाण करुन गळ्याला, पोटाला चाकू लावला. फिर्यादीने सर्व संचालकांचे राजीनामे आणले नाहीत, तर त्यांना "एमपीडीए'च्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत संबंधित व्यक्तींनी त्यांच्याकडून पाच लाख रुपयांची खंडणी घेतली. त्यानंतर फिर्यादीच्या संस्थेत बेकायदा प्रवेश करून कार्यालयाचे दरवाजे तोडून मौल्यवान रेकॉर्ड तसेच संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या खिशातील पाच हजार रुपये व दोन तोळ्याची चैन तोडून नेली. संस्थेच्या चाव्या जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचा उल्लेख फिर्यादीमध्ये करण्यात आला होता.दरम्यान, या प्रकरणातील फिर्यादीमध्ये गिरीश महाजन यांच्याही नावाचा उल्लेख होता. त्यामुळे पुणे पोलिसांनी संबंधित प्रकरणामध्ये महाजन यांची नेमकी भुमिका काय आहे, याचा तपासणार करणार असल्याचे स्पष्ट केले होते.दोन दिवसांपुर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी संबंधित प्रकरणात "मोक्का'अंतर्गत कारवाईबाबतचा उल्लेख केला होता. त्यानंतर संबंधित प्रकरण कोथरुड पोलिस ठाण्यात दाखल असल्याने महिला सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखालील 30 जणांचे एक पथक रविवारी सकाळी जळगावमध्ये दाखल झाले होते. संबंधित पथकाने संबंधीत गुन्ह्यातील संशयित आरोपी व महाजन यांचे निकटवर्तीय असणाऱ्या पाच जणांच्या घरी झाडाझडती घेण्यास सुरुवात केली होती. रविवारी रात्री उशीरापर्यंत झाडाझडती सुरु होती, अशी माहिती सुत्रांनी दिली. महाजन यांची चौकशी झाली नसल्याचीही माहिती सुत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com