

Pune Crime
-हरिदास कड
चाकण : येथील औद्योगिक वसाहतीतील वासुली ता. खेड ,जि. पुणे येथील अमेझॉन कंपनीच्या गेट समोरून ऋषिकेश उर्फ दादया दिलीप कल्हाटकर रा. कोरेगाव बुद्रुक ता. खेड ,जि. पुणे या तरुणाचे सागर जावळे , ओमकार कोरडे , कुणाल चव्हाण यांनी त्यांच्या साथीदारासह थार तसेच आय टेन कार अशा दोन गाड्यांमध्ये येऊन जबरदस्तीने ऋषिकेश कल्हाटकर याला गाडीमध्ये बसवून त्याचे अपहरण केले. त्यानंतर पोलिसांनी सहा तासांमध्ये त्याची सुटका केली. अशी माहिती महाळुंगे उत्तर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिली.