ayush and mother kajal padghan
sakal
शिरूर - कामाला जाताना आपल्या तीन वर्षांच्या लहानग्याला शेजारी राहणाऱ्या जोडप्याकडे सांभाळायला दिलेले असताना जोडप्याने मुलासह पळ काढला. कारेगाव (ता. शिरूर) येथील या अपहरण प्रकरणाची गंभीर दखल घेत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आणि पंजाबमधील लुधियाना येथून जोडप्याला ताब्यात घेत अपहरण झालेल्या लहानग्याची सहा दिवसांनी सुखरूप सुटका केली. आज या लहानग्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केले.