Criminal Shwetang Nikalje Arrested in Pune Kidnapping Case
Sakal
पुणे : तरुणाचे घरातून अपहरण त्याच्या डोक्याला पिस्तूल लावून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या कुख्यात श्वेतांग निकाळजे याच्यासह दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. श्वेतांग भास्कर निकाळजे (वय ३७, रा. भीमनगर, मंगळवार पेठ) आणि ओम संजय गायकवाड (वय २६, रा. मंगळवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार तरुणाचा सिंहगड कॉलेज परिसरात स्टॉल असून त्याने व निकाळजेने एअरटेल कंपनीचे टॉवरचे काम घेतले होते. त्याचे पैसे द्यावेत, यासाठी दोन साथीदारांच्या मदतीने श्वेतांगने आठ नोव्हेबरला रात्रीच्या सुमारास घरातून तरुणाचे अपहरण केले.