दाजीकडून अल्पवयीन मेव्हणीचे अपहरण 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

अल्पवयीन मेव्हणीचे अपहरण दाजींने केल्याची घटना हिंगणे खुर्द येथे घडली. याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात दौंड तालुक्‍यातील केडगाव येथील एका 24 वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

पुणे - अल्पवयीन मेव्हणीचे अपहरण दाजींने केल्याची घटना हिंगणे खुर्द येथे घडली. याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात दौंड तालुक्‍यातील केडगाव येथील एका 24 वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय फिर्यादी महिलेचा भाजीविक्रीचा व्यवसाय आहे. त्या त्यांच्या तीन अल्पवयीन मुलींसह हिंगणे खुर्द भागात राहतात. फिर्यादी यांच्या मोठ्या मुलीचा विवाह केडगावमधील एका व्यक्तीबरोबर झाला. फिर्यादी या सोमवारी (ता. 19) पहाटे तीन मुलींना घरात ठेवून मार्केटयार्ड येथे भाजी खरेदी करण्यास गेल्या होत्या. यावेळी त्यांचा जावई घरी आला होता. त्याच्याकडे घराची चावी होती. त्याने कुलूप उघडून 17 वर्षाच्या मेव्हणीला पळवून नेले. फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर सिंहगड रोड पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपी हा ऊसतोडणी कामगार आहे. फिर्यादी या घटनेनंतर भाड्याचे घर सोडून निघून गेल्या आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल काळे करीत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kidnapping of minor sister-in-law in Pune