

Junnar Man Gets New Life After Kidney Transplant In Pune As Wife Donates Kidney Following Months Of Dialysis Treatment
esakal
-राजेश कणसे
आळेफाटा : दोन्ही किडन्या निकामी झाल्याने सहा महिन्यांहून अधिक काळ डायलिसिसवर असलेल्या वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील किशोर गहिनाजी वाळुंज यांच्यावर पुणे येथील इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. त्यांच्या पत्नी अर्चना वाळुंज यांनी स्वतःची किडनी पतीला दान करून त्यांना नवजीवनाची संधी दिली. प्रत्यारोपणानंतर पती-पत्नी दोघांचीही प्रकृती स्थिर असून ते सुखरूप आहेत.