परीक्षेच्या आधी तणावाने त्रस्त चेहऱ्यावरील रेषा… स्पर्धेच्या दडपणाने चिंताग्रस्त डोळे… आणि मनात न सांगितलेल्या भावनिक गोंधळाची गुंतागुंत. अशी अनेक मुलांची स्थिती डॉ. त्रुप्ती अगरवाल बारकाईने ओळखतात. “आजची मुलं फक्त अभ्यासासाठी नाहीत. त्यांना समजून घेणं, त्यांची काळजी घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे,” असं त्या ठामपणे सांगतात.