नाताळनिमित्त ‘किड्‌स आयडॉल २०१९’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 डिसेंबर 2019

रजिस्ट्रेशन व ऑडिशनचे ठिकाण व वेळ
सोलो डान्स ऑडिशन्स
तारीख - २४ डिसेंबर
ठिकाण - अभिरुची मॉल अँड मल्टिप्लेक्‍स, सिंहगड रस्ता
वेळ - सकाळी ११ ते १ आणि दुपारी ३ ते ६ 

अंतिम फेरी व बक्षीस वितरण
तारीख - २५ डिसेंबर
ठिकाण - अभिरुची मॉल अँड मल्टिप्लेक्‍स, सिंहगड रस्ता
वेळ - सकाळी ११ ते दु. १ (फॅन्सी ड्रेस)
सायं. ४ ते ७ (सोलो डान्स फायनल)
सायं. ७ ते ८ (बक्षीस वितरण) 

स्पर्धेसाठीचे शुल्क
सोलो नृत्य : २०० रुपये
फॅन्सी ड्रेस स्पर्धा - २०० रुपये
संपर्क - ८८०५००९३९५, ९५५२५३३७१३

पुणे - लहानपणापासूनच मुलांना चित्रपटातील गाणी व नृत्याचे आकर्षण असते. त्यामुळे तुमच्या मुलांमधील या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’ आता व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. गेली १० वर्षे ‘किड्‌स आयडॉल’ हा उपक्रम ‘यंग बझ’तर्फे राबविला जात असून, त्याची नोंदणी गुरुवार सुरू झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

दोन ते सोळा वयोगटातील मुला-मुलींसाठी होणाऱ्या ‘किड्‌स आयडॉल २०१९’ या नृत्य स्पर्धेची अंतिम फेरी २५ डिसेंबर रोजी होणार आहे. सोलो डान्स व फॅन्सी ड्रेस असे स्पर्धेचे स्वरूप असेल. वयोगटानुसार ग्रुप तयार केले आहेत. सोलो डान्स स्पर्धा ‘अ’ ते ‘क’ या गटांत विभागली आहे. ‘अ’ गटात बालवाडी ते दुसरी, ‘ब’ गटात चौथी ते सहावी, ‘क’ गटात सातवी ते दहावीतील विद्यार्थ्यांचा समावेश असेल. त्याचबरोबर फॅन्सी ड्रेस स्पर्धेची ‘अ’ गटात बालवाडी ते दुसरी व ‘ब’ गटात तिसरी ते पाचवी, अशी विभागणी केली आहे. स्पर्धेत ‘आयटम साँग्स’ ग्राह्य धरणार नाहीत. सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kids idol 2019 dance competition