‘किड्‌स अँड मॉम फेस्ट’चे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

बच्चेकंपनी व पालकांसाठी नृत्य स्पर्धा व विविध वर्कशॉप; रजिस्ट्रेशन सुरू

पुणे - उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद जल्लोषात साजरा करण्यासाठी मुले व पालकांसाठी ‘सकाळ’तर्फे ‘किड्‌स अँड मॉम फेस्ट’चे आयोजन करण्यात आलेले आहे. हा फेस्टिव्हल येत्या शनिवारी (ता.२७) व रविवारी (ता.२८) कोरेगाव पार्क येथील पुणे सेंट्रल मॉल येथे होणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये बच्चेकंपनीसह पालकांनाही विविध उपक्रमांची भन्नाट मेजवानी मिळणार असून, फेस्टचे रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे.

सुटीत मुलांनी व पालकांनी अनेक प्लॅन्स बनविलेले असतात. समर कॅम्प, खेळ, विविध क्‍लासेस यांसारख्या अनेक कार्यक्रमांच्या वेळापत्रकात लहान मुले मग्न असतात. मुले व पालकांनी एकत्रितरीत्या काही खेळ खेळावेत व वेगवेगळे कार्यक्रम करावेत या उद्देशाने ‘सकाळ’तर्फे या भन्नाट ‘फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. दोनदिवसीय या ‘फेस्ट’मध्ये हॅंड पपेट मेकिंग, पेपर क्राउन मेकिंग, क्‍ले आर्ट, सॉकर प्लेइंग रोबोट, आई व लहान मुलांसाठी (३ महिने ते १५ महिने) खास बेबी कॅरिंग डान्स व नृत्य स्पर्धा, असे वेगवेगळे वर्कशॉप होणार आहेत.

डान्स स्पर्धेद्वारे सायकल व पीएसपीसारखी आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मुलांना मिळणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या गाण्याची एमपी३ सीडी सोबत आणावयाची असून, प्रत्येक स्पर्धकाला जास्तीत जास्त दोन मिनिटे आपल्या नृत्यासाठी दिली जाणार आहेत.

किड्‌स अँड मॉम फेस्ट 
कधी : २७ व २८ मे २०१७ 
कोठे ः पुणे सेंट्रल मॉल, नीतेश हब, वेस्टिन हॉटेलजवळ, कोरेगाव पार्क 
नोंदणीचे ठिकाण व संपर्क : पुणे सेंट्रल मॉल, नीतेश हब, वेस्टिन हॉटेलजवळ, कोरेगाव पार्क (रविवारपासून दुपारी १२ ते रात्री ८) व सकाळ शिवाजीनगर कार्यालय (सोमवारपासून सकाळी ११ ते सायंकाळी ५) 
संपर्क - ८८०५००९३९५ / ९८२२०७८४१५ / ९५५२५३३७१३

डान्स स्पर्धा 
ग्रुप  ए - नर्सरी ते तिसरी 
ग्रुप बी - चौथी ते सहावी 
ग्रुप सी - सातवी ते दहावी 
वेळ : सायं.६.३० पासून 
शुल्क : रु. १०० प्रत्येकी

पहिला दिवस शनिवार, २७ मे
वेळ : सायं ४ ते रात्री ८
हॅंड पपेट मेकिंग वर्कशॉप
वयोगट ः इयत्ता दुसरीपासूनची मुले व पालक
साहित्यासह शुल्क : रु.१५० 
पेपर क्राउन मेकिंग 
वयोगट ः इयत्ता दुसरीपासूनची मुले व पालक 
साहित्यासह शुल्क : रु.१००
क्‍ले आर्ट 
वयोगट - इयत्ता चौथीपासूनची मुले व पालक 
साहित्यासह शुल्क : रु.२००
सॉकर प्लेइंग रोबोट 
वयोगट - इयत्ता पाचवीपासूनची मुले 
साहित्यासह शुल्क : रु.१०००
दुसरा दिवस रविवार, २८ मे 
मॉम अँड बेबी डान्स वर्कशॉप
वेळ : सायं.५ ते ६.
वयोगट : लहान मुले (३ महिने ते १५ महिने) व आई 
कांगारू बॅग आणणे आवश्‍यक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kids & mom fest