हडपसर - टोलफ्री ११२ क्रमांकावरून खून झाल्याची माहिती देणारा मित्रच मित्राचा खूनी निघाल्याची घटना उंड्री हांडेवाडी रस्त्यावर घडली. काळेपडळ पोलिसांनी संशयिताला अवघ्या दोन तासातच जेरबंद केले आहे. शनिवारी (ता. २) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, त्यामध्ये रविकुमार शिवशंकर यादव (वय-३३ वर्षे) याचा खून झाला आहे.