किनारा हॉटेल चौक जीवघेणा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

कोथरूड - पौड रस्त्यावरील किनारा हॉटेल चौकामध्ये वाहनचालक व पादचारी जीवघेणा प्रवास करत आहेत. चौकात सिग्नल नसल्याने वाहनचालक जीव धोक्‍यात घालून रस्ता ओलांडत असल्याने अपघात होण्याची शक्‍यता आहे. या चौकामध्ये सिग्नल किंवा वाहतूक कर्मचारी नेमावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

कोथरूड - पौड रस्त्यावरील किनारा हॉटेल चौकामध्ये वाहनचालक व पादचारी जीवघेणा प्रवास करत आहेत. चौकात सिग्नल नसल्याने वाहनचालक जीव धोक्‍यात घालून रस्ता ओलांडत असल्याने अपघात होण्याची शक्‍यता आहे. या चौकामध्ये सिग्नल किंवा वाहतूक कर्मचारी नेमावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

डेक्कनवरून चांदणी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. याचबरोबर डेक्कन ते चांदणी चौक या मुख्य रस्त्यावरून उत्सव मंगल कार्यालय व सुतारदराकडे जाणारे वाहनचालक जीव धोक्‍यात घालून रस्ता ओलांडत असतात. या परिसरात इंद्रधनू सोसायटी, स्टेट बॅंक कॉलनी यांसारख्या मोठ्या सोसायटी आहेत. तसेच वनाज शाळा, न्यू इंडिया स्कूल शाळा असल्याने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांची सतत वर्दळ असते. तसेच या परिसरात अनधिकृत टपऱ्या, रिक्षा असल्याने रस्ता ओलांडताना वाहनचालकांना अडथळा निर्माण होतो. 

चौकामध्ये महापालिकेने काही वर्षांपूर्वी भुयारी मार्ग बांधला आहे. या भुयारी मार्गातून जाताना महिला, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे असतानाही त्या ठिकाणी ते नसतात. यामुळे रस्ता ओलांडण्यासाठी नागरिक भुयारी मार्गाचा वापर न करता रस्त्याचा वापर करतात. रस्ता ओलांडताना अपघात टाळण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाने तोडगा काढणे गरजेचे आहे. सकाळी व सायंकाळच्या सुमारास या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने वाहतूक पोलिस कर्मचारी नेमणे आवश्‍यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. 

किनारा हॉटेल चौकामध्ये रस्ता ओलांडताना सतत अपघात होतात. चांदणी चौकातून डेक्कनकडे येणारी वाहने अतिशय जोरात येत असतात. तसेच डेक्कनकडून उत्सव मंगल कार्यालयाकडे जाण्यासाठी वाहनचालक वाहने मध्येच घुसवत असल्याने अपघाताचे प्रमाण जास्त आहे. 
- विनायक पटवर्धन, ज्येष्ठ नागरिक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kinara hotel chowk dangerous