किरीट सोमय्या हल्ला : शिवसेना शहराध्यक्षांसह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेत झालेल्या हल्लाप्रकरणी शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Kirit-Somaiya
Kirit-SomaiyaSakal
Summary

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेत झालेल्या हल्लाप्रकरणी शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे - भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal) झालेल्या हल्लाप्रकरणी (attack Case) शिवसैनिकांवर (Shivsena Activists) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून, अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. पण, पुढील कारवाईसाठी पथके रवाना केल्याची माहिती पोलिसांनकडून देण्यात आली.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रशांत लाडे (वय ३०) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, भादवी कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३३६, ३३७, ३२३, ५०४ तसेच मु.पो.अॅक्ट कलम ३७(१) सह १३५ नुसार शहरअध्यक्ष संजय मोरे, पदाधिकारी चंदन साळुंके, किरण साळी, सुरज लोखंडे, आकाश शिंदे, रूपेश पवार, राजेंद्र शिंदे, सनि गवते यांच्यासह ६० ते ७० महिला व पुरूष कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kirit-Somaiya
सोमय्यांनी आरोप केलेले लोक जेलऐवजी भाजपात कसे? - रूपाली पाटील ठोंबरे

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्बो कोविड सेंटरमध्ये झालेल्या घोटाळाप्रकरणी महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या शनिवारी (ता.5) सायंकाळी पुणे महानगरपालिकेत आले होते. ते जुन्या इमारतीच्या मेनगेटने पायऱ्यांवरून जात असताना अचानक इमारतीच्या आतमधून शिवसेनेचे कार्यकर्ते बेकायदेशीर जमाव जमवून तेथे आले. त्यांनी सोमय्या यांना आत जाण्यापासून रोखले. एकाने त्याच्या अंगातील शर्ट काढून तो हवेत भिरवला व त्या शर्टने सोमय्या यांना फटका मारला. त्यानंतर सोमय्या यांची कॉलरपकडून हाताने जोर लावून खेचले व त्यांच्या जिवाला धोका होईल अशा पद्धतीने तिसऱ्या पायरीवरून ओढले. त्यामुळे सोमय्या पडले व त्यांच्या हाताला व डोक्याला मार लागला. त्यानंतर सोमय्या यांच्या गाडीसमोर शहरअध्यक्ष मोरे हे झोपले. तर, इतर कार्यकत्यार्ंनी त्यांच्या गाडीवर हाताने व बुक्यांनी मारहाण केली. हातात दगड घेऊन सोमय्या यांच्या जिवास धोका पोहचविण्यास उद्देशाने थांबले होते, असे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास विक्रम गौड हे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com