Kirit Somaiya : हल्ला प्रकरणी आणखी एका शिवसैनिकाला केली अटक

kirit somaiya
kirit somaiyaesakal

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी एका शिवसैनिकाला अटक केली आहे. तसेच आणखीन एका संशयिताला ताब्यात घेतले असून, तपास सुरू आहे. पोलिसांनी सोमय्या यांच्यावर शर्ट भिरकवणाऱ्या सनी गवते याला अटक केली आहे. मात्र, या हल्ल्यातील शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे तसेच राज्य सचिव किरण साळी अद्याप सापडलेले नाही. पुणे पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यासाठी दोन पथक तैनात करण्यात आले आहेत. हल्ला केलेल्या आणखी शिवसैनिकांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

जम्बो कोविड सेंटरमध्ये झालेल्या घोटाळाप्रकरणी महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या (kirit somaiya) शनिवारी (ता. ५) सायंकाळी पुणे महानगरपालिकेत आले होते. ते जुन्या इमारतीच्या मेनगेटने पायऱ्यांवरून जात असताना अचानक इमारतीच्या आतमधून शिवसेनेचे कार्यकर्ते बेकायदेशीर जमाव जमवून तेथे आले. त्यांनी सोमय्या यांना आत जाण्यापासून रोखले.

kirit somaiya
Roadies Host : सोनू सूदने व्हिडिओ शेअर करीत नवीन सीझनबद्दल मांडले मत

एकाने त्याच्या अंगातील शर्ट काढून हवेत भिरवला व त्या शर्टने सोमय्या (kirit somaiya) यांना फटका मारला. त्यानंतर सोमय्या यांची कॉलरपकडून जोर लावून खेचले व त्यांच्या जिवाला धोका होईल अशा पद्धतीने तिसऱ्या पायरीवरून ओढले (attack Case) होते. त्यामुळे सोमय्या पडले व त्यांच्या हाताला व डोक्याला मार लागला. त्यानंतर सोमय्या यांच्या गाडीसमोर शहराध्यक्ष मोरे हे झोपले. इतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हाताने व बुक्यांनी मारहाण केली होती. दगड घेऊन सोमय्या यांच्या जिवास धोका पोहचविण्यास उद्देशाने थांबले होते, असे तक्रारीत म्हटले होते.

किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सात ते आठ शिवसैनिकांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सोमय्या यांच्यावर शर्ट भिरकवणाऱ्या सनी गवते याला अटक केली आहे. हल्ला केलेल्या आणखी शिवसैनिकांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com