‘केजे’च्या ३६६ विद्यार्थ्यांना नोकरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

गेल्या काही वर्षांपासून शिक्षक व व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले. त्यामुळे हे यश प्राप्त झाले आहे.
- के. जे. जाधव, संस्थापक, के. जे. इन्स्टिट्यूट

गोकुळनगर - के. जे. इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या इंजिनिअरिंगच्या ३६६ विद्यार्थ्यांना एकाच वेळी नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून नवीन विक्रम केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यासंदर्भात इन्स्टिट्यूटचे संस्थापक के. जे. जाधव यांनी सांगितले, की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. संगणकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, कोअर बॅचमधील मेकॅनिकल, सिव्हील व इलेक्‍ट्रिकल अशा सर्व शाखा मिळून एकूण ३६६ विद्यार्थ्यांना टेक महिंद्रा, पर्सिस्टंट, झेन्सॉर, एनटीटी डेटा, इन्फोसिस, टीसीएस, फोक्‍सवॅगन या कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. चार लाखांपासून १२ लाखांपर्यंत विद्यार्थ्यांना पॅकेज मिळाले आहे.’’ 

यासाठी संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, कोशाध्यक्ष विनोद जाधव, संचालक हर्षदा जाधव, विभावरी जाधव, डॉ. सुहास खोत, डॉ. नीलेश उके, डॉ. बी. एम. शिंदे, डॉ. एच. के. अभ्यंकर, डॉ. व्ही. जे. काखंडकी, संचालक प्लेसमेंट प्रा. अनिल अग्रवाल, किरण पवार, विजय मेमाणे, राजूसिंग राठोड यांनी परिश्रम घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: KJ Institute 366 student job receive