पेरूचा भाव कमी न केल्याने विक्रेत्यावर चाकूने वार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

पेरुचा भाव कमी न केल्याच्या रागातून एकाने पेरू विक्रेत्यावर चाकूने वार केला. ही घटना बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खराडी बायपास रस्त्यावर घडली. या बाबत मयूर खुरंगळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : पेरुचा भाव कमी न केल्याच्या रागातून एकाने पेरू विक्रेत्यावर चाकूने वार केला. ही घटना बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खराडी बायपास रस्त्यावर घडली. या बाबत मयूर खुरंगळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रशांत कल्याण जाधव (वय 30, रा. मांजरी बुद्रूक) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सुरेश शिंदे (वय 42) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत हे दररोज खराडी बायपास परिसरात सायकलवर पेरूची विक्री करतात.

भारतीय कलाकारांना नाचवून तो भारतविरोधी कारवायांनाच करायचा फंडिंग

बुधवारी दुपारी ते खराडी बायपास रस्त्यावर असलेल्या डॉमीनोझ पिझ्झासमोर पेरू विकत होते. त्यावेळी मयूरने त्यांच्याकडे कमी किमतीत पेरू मागितले. मात्र, दर परवडत नसल्याने त्यांनी मयूरला पेरू देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्यामुळे मयूरने प्रशांतच्या पोटावर पाठीवर, मांडीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Knife attack on Hawker in Kharadi Bypass Pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: