esakal | दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला उद्या येताय? ही आहे ट्रॅफिकची व्यवस्था
sakal

बोलून बातमी शोधा

dagadusheth

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने गणेशोत्सवानिमित्त अथर्वशीर्ष पठण या कार्यक्रमाचे मंगळवारी (ता. 3) शिवाजी रस्त्यावर आयोजन केले आहे. त्यामुळे मंगळवारी पहाटे पाच वाजल्यापासून ते अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम संपेपर्यंत या रस्त्यावरील जिजामाता चौक ते रामेश्‍वर मंदिरापर्यंतचा रस्ता बंद राहणार आहे.

दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला उद्या येताय? ही आहे ट्रॅफिकची व्यवस्था

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने गणेशोत्सवानिमित्त अथर्वशीर्ष पठण या कार्यक्रमाचे मंगळवारी (ता. 3) शिवाजी रस्त्यावर आयोजन केले आहे. त्यामुळे मंगळवारी पहाटे पाच वाजल्यापासून ते अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम संपेपर्यंत या रस्त्यावरील जिजामाता चौक ते रामेश्‍वर मंदिरापर्यंतचा रस्ता बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. 

असे आहेत पर्यायी मार्ग 
शिवाजी रस्ता : जिजामाता चौक ते रामेश्‍वर मंदिर चौक वाहतुकीसाठी बंद असेल. 
पर्यायी रस्ता : गाडगीळ पुतळा, जिजामाता चौकातून डावीकडे वळून गणेश रोडने फडके हौद चौक, देवजीबाबा चौकातून उजवीकडे वळून हमजेखान चौकातून सरळ महाराणा प्रताप मार्गावरून गोविंद हलवाई चौकात उजवीकडे वळून गोटीराम भैय्या चौकातून डावीकडे वळून शिवाजी रस्त्यावरून पुढे जाता येईल. 

अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक वाहतुकीसाठी बंद 
पर्यायी मार्ग :अप्पा बळवंत चौकातून डावीकडे वळून बाजीराव रस्त्यावरून फुटका बुरुज मार्गे गाडीतळ पुतळा चौक, उजवीकडे वळून जिजामाता चौकातून पुढे फडके हौद, देवजीबाबा चौक, गोविंद हलवाई चौक, गोटीराम भैय्या चौकातून शिवाजी रस्त्याकडे जाता येईल. 

लक्ष्मी रस्त्यावरील विजय मारुती चौक/सोन्या मारुती चौकातून आवश्‍यकतेनुसार वाहतूक वळविली जाईल. 
पर्यायी मार्ग : विजय मारुती चौक, शुक्रवार पेठ पोलिस चौक, नेहरू चौक, श्रीनाथ चित्रपटगृह, रामेश्‍वर चौकातून इच्छित स्थळी जाता येईल. 

 

loading image
go to top