esakal | मुंबई-पुणे 'एक्सप्रेस वे'वर भीषण अपघात; कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेचा अधिकारी ठार
sakal

बोलून बातमी शोधा

 Kolhapur District Co-operative Bank officer killed in Accident on Mumbai-Pune Expressway

मुंबई-पुणे 'एक्सप्रेस वे'वर भीषण अपघात; कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेचा अधिकारी ठार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी (ता.०३) पहाटे मोटार व ट्रकच्या भीषण अपघातात कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेतील साखर कारखाना कर्जपुरवठा विभागाचे व्यवस्थापक रणवीर चव्हाण (वय ५१ रा. मूळ सांगली) यांचा जागीच मृत्यू झाला. गाडीमधील दोन जण जखमी झाले आहेत. 

रणवीर चव्हाण यांच्यासह इतर दोन अधिकारी कोल्हापूरहून मुंबईला निघाले होते. साखर कारखान्याच्या कर्जाबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी आज त्यांची मंत्रालयात बैठक होती. त्यासाठीचे प्रस्ताव घेऊन ते निघाले होते. त्यांच्या मोटारीने ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

loading image