#BoycottChina : अख्ख्या गावानेच केलाय चिनी उत्पादनांचा बहिष्कार; कोणतं आहे हे गाव?

Boycott_China
Boycott_China

पुणे : खडकवासला येथील कोंढवे-धावडे गावातील ग्रामपंचायती मार्फत सर्व प्रकारच्या चिनी वस्तूंचा बहिष्कार करण्यात आला आहे. याबाबतचा ठराव नुकताच मंजूर करण्यात आला असून अशा प्रकारचा ठराव करणारी ही पहिली ग्रामपंचायत आहे. गलवान खोऱ्यामध्ये शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना या ठरावाच्या माध्यमातून श्रद्धांजली देण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना कोंढवे धावडे ग्रामपंचायतीचे सरपंच नितीन धावडे म्हणले, "या गावातून अनेक जवान लष्करात सामील झाले आहेत. तसेच अनेक पैलवान आज या गावातून तयार होत आहेत. अशात देशाच्या संरक्षणासाठी गलवान येथे शहीद झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे."

या ठरावाप्रमाणे गावात चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्यात आला असून ग्रामपंचायत कार्यालयात वापरण्यात येणाऱ्या संगणकाचे हार्डवेअर, स्टेशनरी आणि इतर चिनी वस्तूंचा वापर केला जाऊ नये. तसेच कोंढवे धावडे गावाच्या हद्दीमध्ये व्यापार करणाऱ्या व्यावसायिकांना चिनी मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री बंद करण्याचे आवाहन माजी उपसरपंच स्नेहल धावडे यांनी केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com