esakal | राज्यभर रोष पण, बारामतीत पडळकरांच्या समर्थनार्थ घोषणा; पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

bjp workers raised slogans for gopichand padalkar support Baramati

बारामती येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज शहरातील भाजप कार्यालयासमोर एकत्र येत गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.

राज्यभर रोष पण, बारामतीत पडळकरांच्या समर्थनार्थ घोषणा; पाहा व्हिडिओ

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

बारामती (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात रोष आहे. राज्यभरात ठिकठिकाणी त्यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. परंतु, शरद पवार यांच्या बारामतीत पडळकरांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शहर भाजपची घोषणाबाजी
बारामती येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज शहरातील भाजप कार्यालयासमोर एकत्र येत गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे, तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, शहराध्यक्ष सतीश फाळके, सुधाकर पांढरे, यांच्यासह काही कार्यकर्ते उपस्थित होते. आज बारामती शहर पोलिस ठाण्यात गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंीततर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. गोपीचंद पडळकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है...अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.  

आणखी वाचा - पडळकरांच्या विरोधात बारामतीत गुन्हा दाखल

काय आहे प्रकरण?
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूरमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्याविषयी अवमानकारक भाष्य केले होते. त्यावरून राज्यात पडळकर यांच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला. सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात पवार समर्थकांनी रान उठवले. गेल्या दोन दिवसांत पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध करणारी अनेक आंदोलने राज्यभरात झाली आहेत.