
कोंढवा, ता. २४: पहलगममध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेले कोंढव्यातील उद्योजक कौस्तुभ गनबोटे यांचे पार्थिव त्यांच्या साईनगर भागातील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी कौस्तुभ गनबोटे यांचा मुलगा कुणाल याचा मित्र शाहरुख इमानदार हा तिथे अंत्यदर्शनासाठी आला असता तेही आणि तुम्हीही मुस्लिमच; पण तुमच्यात एवढा फरक कसा रे? असा प्रश्न करत कौस्तुभ यांच्या पत्नी संगीता यांनी टाहो फोडला.