काळी जादू,करणी झाल्याचे सांगत पावने तीन लाख उकळले; एकास अटक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 January 2021

एका नागरीकाची  तब्बल पावणे तीन लाख रूपयांची आर्थिक फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करीत एकास अटक केली.

पुणे, - घरावर काळी जादू व करणी असल्याचे सांगुन त्यावरील उपायासाठी जादूटोणा करीत एका नागरीकाची  तब्बल पावणे तीन लाख रूपयांची आर्थिक फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करीत एकास अटक केली.

नईम मुस्तकीन सिद्दकी (वय 48, रा. जीवनबाग, मुंब्रा) असे गुन्हा दाखल झालेल्या 
व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा खुर्द येथील एका 32 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. नईम याने अशाप्रकारे अनेकांची फसवणूक केली असून, जुन्नर येथील काही नागरिक तक्रार करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.  

पुण्यात मेल आयडी हॅक करून 5 कोटींची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची पत्नी काही वर्षापासून आजारी आहे. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार करुनही त्यांना बरे वाटत नव्हते. दरम्यान फिर्यादीला ओळखीच्या लोकांकडुन नईमबद्दल माहिती मिळाली होती. त्यानुसार दिवाळीच्या सुमारास नईम फिर्यादींच्या घरी आला. त्यानंतर त्याने नारळ फोडून उपाय सुरू केले होते.  त्यावेळी नाराळामध्ये केस, लाल कपडे, लिंबू अशा गोष्टी निघाल्या. त्यानंतर  नईमने तुमच्या घरावर कोणी तरी काळी जादू, करणी केली असल्याचे सांगत फिर्यादीला आपल्या जाळ्यात ओढले.

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

त्यावर उपाय म्हणून हरणाची कस्तूरी, मातीची भांडी, सात प्रकारचे धान्य, लिंबू, अगरबत्ती अशा 15 प्रकारचे साहित्य लागेल असे सांगितले. हरणाच्या एक तोळे कस्तुरीसाठी 35 हजार रुपये लागतील, असे सांगितले. कस्तुरीसाठी एक लाख पाच हजार रुपये, पूजेसाठी 40 हजार रूपये घेतले. फिर्यादी यांच्याकडून नईमने एकूण दोन लाख 70 हजार रूपये घेतले.  त्यानंतर आणखी दोन कस्तुरी लागतील, असे सांगितले. त्यामुळे फिर्यादीला संशय आला. ही पूजा केली तरी काहीच फरक पडला नाही.  त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kondhwa police arrest one Crimes under the Prevention of Witchcraft Act

Tags
टॉपिकस
Topic Tags: